उत्तर प्रदेश मधील हाथरस मध्ये कु.मनीषा वाल्मिकी सामूहिक बलत्कार हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या - कपील जुन्नेकर
कु.मनीषा वाल्मिकी सामूहिक बलत्कार हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीचे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे
तहसिलदार काशीनाथ पाटील यांना दिले निवेदन
मुखेड / प्रतिनिधी (भारत सोनकांबळे) : उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील कु.मनीषा वाल्मिकी या अनुसूचित जातीच्या तरुणीचा मागील १५ दिवसापुर्वी चार नराधमानी सामूहिक बलत्कार केला होता, सदर घटना ही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली असून ही धक्कादायक बाब म्हणजे नराधमांनी तरुणीची जीभ देखील कापली व गंभीर अवस्थेत असलेल्या कु. मनीषा वाल्मिकी वरती रुग्णालयात या तरुणीवर उपचार सुरू होते मात्र मंगळवार दि.२९ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी पीडित मुलीची मृत्यू शी झुंज
अपयशी ठरली आणि पीडित तरुणीचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील कु. मनीषा वाल्मिकी या तरुणीवर बलत्कार करून हत्या करणाऱ्या नराधमाना लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.या मागणीचे निवेदन दि.३० सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तहसीलदार काशीनाथ पाटील यांना देण्यात आले. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे नांदेड जिल्हाध्यक्ष कपिल जुन्नेकर, अमोल वाकोडे ( जिल्हाध्यक्ष व्ही.जे.एन.टी.), शिवाजी कबनुरकर (तालुकाध्यक्ष रा.कॉ.सा.न्या.वि.), नामदेव पाटील तांदळीकर, प्रवीण बनसोडे, गौतम सिरसाठे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments