रोहीतदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्तं पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटाईझरचे वाटप

पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दादांच्या सूचनेनुसार वाकड पोलिस स्टेशन मधील पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटाईझरचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना सारख्या कठीण काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केल्याबद्दल वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा विवेक मुगळीकर साहेब यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. 
यावेळी श्री. सुंदरआबा पवार, श्री. पियुषदादा सजगणे, श्री. रणजित सावंत, श्री.आकाश साबळे, श्री.प्रकाश म्हस्के, श्री.अशोक पवार, श्री.संतोष केदारी, श्री.सुरज होके, कु. परमेश्वर ढोबळे ई. मित्र परिवार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आम्हाला श्री विशालभाऊ वाकडकर व शेतकरी पुत्र दयानंद बापू शिंदे यांचे मोलाचे
मार्गदर्शन लाभले.