गांधी व शास्ञी जयंतीनिमित्त "कोविड योद्धा" सन्मानपञ वाटप समारंभ
देवणी / प्रतिनिधी : महात्मा गांधी व लालबाहदुर शास्ञी यांच्या संयुक्त जयंतिचे औचित्य साधुन प्रेस संपादक व सेवा संघाच्या वतीने ग्रामीण महिला विकास संस्था देवणी येथील कार्यालयात शुक्रवारी (ता.०२) कोवीड योद्ध्यांना सन्मान पञ वाटप करण्यात आले. या कार्यक्रामाच्या अध्यक्षा म्हणून ग्रामीण महिला विकास संस्थेच्या चेअरमन कुशावर्ताताई बेळ्ळे यांच्या हास्ते कोरोणा काळात कोव्हिड आपत्ती मध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता सामाजिक जबाबदारी समजून व देशसेवेचे व्रत म्हणून पञकार,आशा कार्यकर्ती ,गटपर्वतक,सामाजिक कार्यकर्ते ,यांनी कोरोणा योद्धा म्हणून आपली भुमिका बजावली त्यामुळे प्रेस संपादक व पञकार संघटनेचे अध्यक्ष प्रा.डि.टी.अंबेगावे यांच्या मार्गदर्शना नुसार देवणी तालुका प्रेस संपादक व पञकार सेवा संघाच्या वतीने कोवीड योद्धा सन्मान पञ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी कोवीड योद्धा सन्मान कुशावर्ताताई बेळ्ळे,पञकार बालाजी टाळीकोटे,शकिल मनियार,कृष्णा पिंजरे,नरसींग सुर्यवंशी,दिलीप शिंदे,शोभा बिरादार,सुरेखा सुर्यवंशी,वत्सला सुर्यवंशी, राजाराम पाटील,कचराबाई ईसाळे,भगवान इसाळे,धनाजी कांंबळे ,सुखवास इसाळे,प्रकाश कांंबळे ,रेखा लांडगे,आनिल मिटकरी,'पांडुरंग कदम,सुनिता सुर्यवंशी,आदीना देण्यात आले
तत्पुर्वी माहत्मा गांधी व लालबहादुर शास्ञी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले व शेवटी देशात घडलेल्या निंदणीय घटना उत्तर प्रदेशातील हाथरस,बलरामपुर व तेलंगानातील मोईनाबाद बलत्कार हत्या कांडातील अत्याचार म्रत महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी पत्रकार बालाजी टाळीकोटे, राजाराम पाटील, धनाजी कांबळे,कुशावर्ताताई बेळ्ळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन सुखवास ईसाळे यांनी केले व प्रास्ताविक प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी केले तर आभार सत्यशिला सरवदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुर्यवंशी नागनाथ,प्रेरणा जाधव,विकास बिरादार,सुनिता सुर्यवंशी आदीनी परिश्रम घेतले.

0 Comments