निष्ठूर काळाने पैलवानालाच डाव घातला ; नामदेव घुमे काळाच्या पडद्याआड...
चाकूर : समाजातील अशा काही व्यक्ती असतात की, त्यांच्या नावावरुन गावचे नाव प्रसिद्ध होते. कै.नामदेव घुमे यांच्या बाबतीत असेच होते. कुणी जर विचारले कोणत्या गावचे? अलगरवाडीचे का? असं म्हटलं की ,पैलनवानच्या गावचे का?अशी आगळी आणि वेगळी ओळख त्यांच्या नावात होती.
आज सकाळी मला त्यांच्या निधनाची बातमी कळाली, तेव्हा मन सुन्न झाले. आणि त्याच क्षणी मला लहान पणीचे दिवस आठवले.... नामदेव घुमे, सुधाकर घुमे आणि मी जगत जागृती शाळेत ६,७,वी पर्यंतचे बालमित्र होतो.
नंतर नामदेव यांनी शाळा सोडली आणि कुस्तीकडे वळले. त्यांच्या घरात लहान पणापासून कुस्तीचे वातावरण होते. त्यांचे वडील कै. बाबुस घुमे पाटील हे जुन्या काळातील कुस्ती पटटू होते. त्यांनी आपल्या चारही मुलांना बालाजी घुमे, नारायण घुमे, नामदेव घुमे , मुक्तीराम घुमे, यांना कुस्तीचे धडे दिले. चौघानेही लाल मातीतल्या कुस्त्या खेळल्या.... पण चौघांपैकी कै. नामदेव घुमे यांनी भल्या..., भल्या..., पैहलवानास आसमान दाखवून मैदान गाजविले .
त्यांच्या खेळाची चुनूक पाहुन त्यांना हिंदकेसरी हरिश्चंद बिराजदार पुणे यांच्या तालमीत ठेवण्यात आले. आपल्या चपळाईने ते हरिश्चंद्र बिराजदार यांचे शिष्य बनले. पुढे त्यांनी हिंदकेसरी गणपतराव आंळंदकर, कोल्हापूर येथील गंगावेश तालमीत प्रशिक्षण घेतले .
आणि आपल्या कुस्ती कार्यास सुरुवात केली. मलाही कुस्तीची आवड असल्याने त्यांच्या सोबत ग्रामीण भागातील अनेक प्रसिद्ध फडांना भेटी देऊन त्यांची शेवटची कुस्ती पाहण्याचा योग आला.
कलकोटी, गुडसुर, उजळंब, उदगीर, हाळी, अहमदपूर, शिरुरताजबंद, चापोली, परळी, देवणी, झरी बु ,यागावासह संपूर्ण मराठवाड्यातील अनेक गावांत लाल मातीतील शेवटची कुस्ती खेळून आपल्या घराण्याचे व गावचे नाव मोठे केले.
त्यांनी उपमहाराष्ट केसरी,लातूरचा सिद्धेश्वर केसरी, अशा अनेक मानाच्या कुस्त्या जिंकल्या होत्या , ते अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांचे जोडीदार होते. त्यांनी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या "जिवलगा" या चित्रपटात भूमिका केली होती.
कुस्तीतुन निवृत झाल्यानंतर त्यांनी हाॅटेलचा व्यवसाय सुरु करुन, आनंदाने जीवन कंठीत असताना काही महिन्यांपूर्वी मोठ्या मुलांचे वीजेच्या करेंटचा शाॅक लागून त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दु:खातुन सावरुन परत व्यवसाय सांभाळत असताना अचानक आजाराने त्यांना घेरले .भल्या,भल्या,पैहलवानास धडकी बसवून त्यांची पाठ लावनाऱ्या या पठ्ठयासच काळानेच शेवटचा डाव घातला..., परंतु या निसर्गाच्या डावापुढे माझा वर्ग मित्र टीकु शकला नाही. जीवनाच्या अंतिम पकडीत काळाने डाव साधला त्यात त्यांचा अंत झाला.
कुस्तीचे मैदान गाजवनाऱ्या
आणि आदर्श अलगरवाडीचे नाव गाजवनाऱ्या माझ्या वर्ग मित्रास जड अंतःकरणाने नयन अश्रुनी श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी थांबतो.
प्रा वैजनाथ सुरनर
सदस्य
डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन मंत्रालय,मुंबई.
0 Comments