नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा शेतकऱ्यांशी औनलाईन वेबिनारद्वारे संवाद
--------------
कोरोना काळात शेतक-यांशी हितगुज करणारे एकमेव आमदार ठरले संभाजीराव पाटील निलंगेकर
---------------
देवणी / प्रतिनिधी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत महाराष्ट्र शासन क्रषि विभागाच्या वतीने निलंगा उपविभागाच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी (ता.२९) मौ.नागराळ येथे औनलाईन वेबिनार घेण्यात आले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) व महाराष्ट्र शासनाचा क्रषि विभाग यांच्या वतीने निलंगा उपविभागातील सर्व शेतकऱ्यांसाठी माजीमंत्री आमदार मा.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली मौ.नागराळ येथे औनलाईन वेबिनार घेण्यात आले.
या वेबिनार मधून आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा प्रकल्प असून गेली दोन वर्षांपासून या योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना आवश्यक नवनवीन तंत्रज्ञान व शेतीशी निगडित यांत्रिकीकरण, सिंचनाच्या योजना अनुदान तत्वावर आधारित आहेत त्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन या वेबिनारच्या माध्यमातून केले.
सध्या कोरोनाने सारा देश परेशान आसतांना सुद्धा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या भागातील शेतकऱ्यांसोबत औनलाईन वेबिनार द्वारे शेतकरी हितासाठी महाराष्ट्र राज्यातील एकमेव आमदार ठरणारे संभाजीराव पाटील हे हितगुज केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व सामान्यांच्या तोंडून चर्चा ऐकायला मिळत आहे.
गावातील शेतकऱ्यांना वेबीनार बद्दल माहिती देऊन प्रत्यक्ष वेबीनार मधे मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी पोकराचे शेतीशाळा प्रशिक्षक बालाजी टाळीकोटे यांनी समन्वयक म्हणून आपली भूमिका बजावली.
या वेळी क्रषिताई मनिषा चामले,क्रषि मित्र संदेश चामले,महिला शेतकरी अनिता चामले,चंद्रकला भिंगे,जयश्री पोतशेट्टे, पाटील गंगूबाई, प्रदीप शिद्धेश्वरे,दिनकर चामले,सुदर्शन चामले,वैजनाथ तेलंग, हंसराज चामले,आष्टूरे नागनाथ, सिताराम पोलशेट्टे,दिपक आष्टूरे, दिपक गौंडगावे,ताहेरसाब शेख,रमेश गौंडगावे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
"उपस्थिती तपासणी बाबत पोकराचे म.वि.सोनवणे यांनी माहिती दिली. वैयक्तिक घटकाबाबत माहिती आर. एस. कदम उपविभागीय कृषी अधिकारी लातूर यांनी दिली. उदगीरचे उपविभागीय कृषी अधिकारी एम.डी.तिर्थकर यांनी सामुदायिक घटकाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक डि.एस. गावसाने यांनी प्रकल्पाबाबत मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हाधिकारी माननीय श्री.जी. श्रीकांत साहेब यांनी प्रकल्प अंमलबजावणी बाबत सूचना केले. अध्यक्षिय समरोपात निलंगा विधानसभेचे आमदार श्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रकल्प राबविण्याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले तर आभार एस.व्ही. मराठे यांनी मानले."

0 Comments