वागदरीच्या देवनदी पूलावरुण जाताना पाण्यात पडुन वृद्धाचा मृत्यू 

देवणी / प्रतिनिधी :  तालुक्यातील मौजे वागदरी येथील केरबा गुंडाजी मोरे वय 66 वर्ष हे  देव नदिच्या पूलाच्या पाण्यावरुण जात आसताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाण्यात पडुण वाहुण जाऊण मरण पावले आहेत.
     रविवारी दि.27 ते 28-9-20 रोजी व्यंकट बिरादार यांच्या शेता लगत मृतदेह सापडला आसल्याचे सांगण्यात आले आहे.महादेव केरबा मोरे यांच्या फिर्यादवरुण दि.28-9-20 रोजी देवणी पोलीसात गु.र.न.57/2020 कलम 174 सी.आर.पी.सी.नुसार देवणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस नाईक सर्फराज गोलंदाज हे करीत आहेत.

म्रतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात नेले असता युवा कार्यकर्ता शिवाभाऊ कांबळे, रणदिवे सुखवंत  दिलीप सुर्यवंशी व इतर कार्यकर्ते यांनी लवकरात लवकर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात यावी म्हणून प्रयत्न केले.