'ब्रिक्स' राष्ट्रातील युवा वैज्ञानिक संमेलनात पाच राष्ट्रातुन 100 तर भारतातुन 19 जणांचा सहभाग.. 

युवा शास्ञज्ञ  निलंगा तालुक्याती सावनगीरच्या संदिप सोमवंशीला मिळला दीड लाखाचा पुरस्कार

लातूर / प्रतिनिधी : ब्रिक्स राष्ट्रांतील युवा वैज्ञानिक संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संदीप सोमवंशी या विद्यार्थीला प्रथम पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. 21ते 25 सप्टेंबर दरम्यान झालेल्या संमेलनात पाच राष्ट्रांतील 100 युवा शास्ञज्ञ निमंञित होते. भारतातुन 19 जणांचा समावेश होता. तर राज्यातुन एकट्या निलंगा तालुक्यातील सावनगीरच्या संदिपच्या वाट्यालाच बहुमान आला. दोन हाजार डॉलर आर्थात 1 लाख 48 हाजार रूपये प्रमाणपञ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्ञ विभागातील संशोधक विद्यार्थी संदिप सोमवंशी यांचाही समावेश होता. संमेलनात *सायन्स स्टँडअप बँटल* स्पर्धा घेण्यात आली यात संदिपने प्रथम पारितोषिक पटकावले गुणवतापुर्ण आशा 18 भारतीय वैज्ञानिक यामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. संदिपने आतिसुछम चुंबकीय पदार्थाची निर्मिती त्यांच्या वौधयकिय छेञातील कर्करोगासारख्या आजारावर वेदनारहित व अचुक रोग निवारन करणाच्या विविध अनुप्रयोगांवर करत आसलेल्या संशोधनाचा सारांश या स्पर्धेत मांडला. संदिपच्या या संशोधनाला 'ब्रिक्स' च्या तज्ञ समितीच्या सदस्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे प्रथम पारितोषिक मिळवले. 
        यापुर्वी निलंगा तालुक्यातील सावनगीरच्या संदिप सोमवंशी यांनी जर्मनी गाजवली होती. संदिपला नोबल लॉरेटच्या परिषदेसाठी जर्मनीला निमंञित केले होते. 30 जुन ते 5 जुलै दरम्याच्या परिषदेसाठी 88 देशांतून 580 जणांना निमंञित केले होते. भारतातून 15 जणांचा सहभाग होता.