सरसकट लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
लातूर / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सरसकट वीरशैव लिंगायत समाजाला आरक्षण लागू करावे हे आरक्षण लागू होण्यासाठी शासनाने शुध्दीपत्रक काढावे या मागणीचे निवेदन आज दिनांक 9/10/2020 रोजी मा.जिल्हाधिकार्यांना लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष मा.प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते देण्यात येत आहे.
लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी मा.प्रा.सुदर्शनराव बिरादार सर गेली 20-22 वर्षापासून लढा देत आहेत. सुरूवातीला वाणी नावाला आरक्षण मिळवून घेतले नंतर सोपल समितीने लिंगायत समाजाच्या 14 पोटजातींना आरक्षण जाहीर केले आणि वाणी नावाने लागू झालेल्या शब्दाच्या मागे लिंगायत शब्द लावला व लिंगायत वाणी या नव्या शब्दाला आरक्षण दिले 14 पैकी 14 जाती पुर्वीच आरक्षित होत्या. अशाच सर्व पोटजातींना आरक्षण देवून लिंगायतांना फसवे आरक्षण दिले. समाज या कृतीने नाराज झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात निवडणुकीत उभा टाकला. पुढे भाजपाचे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आले. त्यांनी दोन-तीन वेळेला मुंबई येथे बैठका घेतल्या. पण बोलाचीच कडी न बोलाचाच भात. लिंगायतांना आरक्षण न देवून फडणवीस यांनी समाजाची फसवणूक केली. आता आघाडी सरकार आले आहे. आम्ही हीच मागणी घेवून पुन्हा या सरकारला विनंती करत आहोत. महाराष्ट्रात लिंगायत समाजाला लिंगायत, हिंदु लिंगायत, वीरशैव, वाणी, लिंगायत वाणी आदि नावाने ओळखले जाते व तशाच प्रकारची नोंद सामजबांधवांच्या कागदपत्रावर आहे.
महाराष्ट्रात वाणी नावाला लागू असलेले आरक्षण सरसकट लिंगायत, हिंदु लिंगायत व वीरशैव नावाने जातीची नोंद असणार्या सरसकट लिंगायत समाजबांधवांना लागू करावी व लिंगायतांना हे आरक्षण लागू होण्यासाठी शासनाने लिंगायत, हिंदु लिंगायत वाणी व वीरशैव हे एकाच जातीची नावे आहेत असे शुध्दीपत्रक काढावे असे जर झाले तर महाराष्ट्रातील लाखो समाजबांधवांना आरक्षणाचा लाभ मिळेल. अशी विनंती मा. जिल्हाधिकार्यामार्फत लिंगायत महासंघ महााष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांना करीत आहे.
तसेच 13 जुलै 2011 रोजी प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी तत्कालीन सरकारकडून मंजुर करून घेतलेले मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वरांचे स्मारक त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. ते काम त्वरीत सुरू करावे. त्यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्याव या मागणीसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मागणी होत आहे.
तरी लिंगायत समाजाच्या भावना शासनाने समजून घ्याव्यात. तसे नाही केल्यास महाराष्ट्रातील लिंगायत समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला लिंगायत महासंघाचे सोलापूर जिल्हा संघटक सुरेश वाले तसेच शहराध्यक्ष सिध्देश्वर वाकळे, सचीन शिवशक्ती,बार्शी तालुकाध्यक्ष अक्षय घोंगडे, मोहोळ तालुकाध्यक्ष संतोष म्हमाणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होेते.

0 Comments