बार्टी समतादूत विभाग लातूरच्या वतीने जागतिक बेघर निवारा दिवस साजरा.
लातूर / प्रतिनिधी : 10 ऑक्टोंबर रोजी जागतिक बेघर दिवसानिमित्त डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे बार्टी लातूर जिल्ह्याच्या वतीने उदगीर येथे सलात अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रोटी कपडा बँक यांच्या बेघर निवारा केंद्र उदगीर या ठिकाणी साजरा करण्यात आला.
बेघर लाभार्थी यांनी खऱ्या अर्थाने या केंद्रात येवून त्यांनी केंद्राला एका घरात रूपांतरित केले आहे. निवारा केंद्र हेच त्यांच्या जगण्याचे केंद्र बनले आहे. या माध्यमातून त्यांनी सामाजिक जीवनात प्रगती करत राहावी असे मत समतादूत प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजकुमार धनाशिरे यांनी व्यक्त केले.बार्टी समतादूत यांच्या कडून वेळोवेळी हवी ती मदत केली जाईल अशी माहिती ही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
बेघर निवारा केंद्राचे संचालक गौस शेख यांनी जागतिक निवारा दिन निमित्त दिनांक 1 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर या दरम्यान घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी बेघर निवारा केंद्रात पुढील काळात अनेक सोयी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच शहरातील किंवा इतर ठिकाणच्या लोकांना निवारा केंद्र बद्दल जास्तीत जास्त माहिती सांगून त्यांना लाभ घेण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
या दिनाचे औचित्य साधून बेघर लाभार्थ्यांना पुष्प देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि बार्टीच्या वतीने महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांचा संच निवारा केंद्रास भेट देण्यात आला.

0 Comments