उत्तर प्रदेश मधील योगी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी अंबरनाथ येथे शिवसेनेचे जन धरणे आंदोलन

 पुणे / प्रतिनिधी : (सुनिल ज्ञानदेव भोसले) उत्तर प्रदेश मधील योगी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी अंबरनाथ येथे शिवसेने तर्फे जन धरणे आंदोलन करण्यात आले. कल्याण जिल्हा प्रमुख श्री.गोपाळ लांडगे  यांच्या आदेशानुसार अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख  श्री.अरविंद अण्णा  वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा आई ग्रुप चे अध्यक्ष व शिवसैनिक मा.श्री.अजय दादा मोहोरीकर आणि असंख्य शिवसैनिकांनी उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित तरूणी वरील बलात्कार, अत्याचार व खून प्रकरणी दलित समाजातील तरूण मुलीला न्याय मिळण्यासाठी तसेच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या  उत्तर प्रदेश मधील योगी सरकारचा जाहीर निषेध केला.वॉर्ड क्रमांक ३५ व ३६ मधील नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर चौक विभागमध्ये जन धरणे आंदोलन करून उत्तर प्रदेश मधील योगी सरकारचा जाहीर निषेध केला.