संत कबीर वारकरी शिक्षण संस्थेत सँनिटायझर व मास्कचे वाटप
उदगीर / प्रतिनिधी : संत कबीर वारकरी शिक्षण संस्थेत अभिषेक सोलापुरे यांनी आपला वाढदिवस सँनिटायझर व मास्क व फळे वाटप करुन साजरा केला. संत कबीर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. भागवत महाराज काटेवाड व ह.भ.प. वामन मुंडे महाराज डोंगरजकर यांच्या हस्ते सँनिटायझर व मास्क व फळे यांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून विवेक होळसंबरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी गिरीश सोलापुरे प्रशांत सोलापूरे आनंद जगताप दीपक कामशेट्टे व विवेक होसंबरे हे उपस्थित होते.
0 Comments