युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आटपाडी यांच्या हस्ते आटपाडी तालुक्यातील विविध मागण्यांचे निवेदन..
आटपाडी / प्रतिनिधी : रविवारी दि. ४/१०/२०२० रोजी सांगली येथे मा ना. जयंतरावजी पाटील साहेब (मंत्री जलसंपदा व पालकमंत्री सांगली जिल्हा तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य) यांची भेट घेवून अमित ऐवळे तालुकाध्यक्ष युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आटपाडी यांच्या हस्ते आटपाडी तालुक्यातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आटपाडी तालुक्यातील पिकांचे व फळबागांचे अतीव्रुष्ठीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिवाय हातातोंडाशी आलेले पिके व बागा गेल्या आहेत त्वरीत सर्व पंचनामे पुर्ण करून शेतकरयांना मदत करावी व हवालदिल शेतकरयांना धिर द्यावा.
पिकविमा कंपण्यांना सुचना करून तत्काळ विम्याची रक्कम मिळावी व शेतकरयांना न्याय द्यावा.
आटपाडी तालुक्यात बँका व सोसायट्या शेतकरयांना कर्जपुरवठा करताना वेठीस धरत आहेत याची चौकशी करुन तत्काळ कारवाई व्हावी.
आटपाडी तालुक्यातील हत्येच्या प्रकरणातील आरोपींना हत्येची माहिती मिळताच टिमवर्कच्या माध्यमातून केवळ तास ते दिडतासात आरोपींना गजाआड करणार्या आटपाडी पोलीस ठाण्यातील कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी व त्यांच्या तपास पथकाची चौकशी करून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात यावे व अन्य विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी मा अविनशकाका पाटिल (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सांगली) मा सुशांतभाऊ देवकर (क्षेत्राध्यक्ष आटपाडी-खानापुर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) मा संभाजी ढोक ( जिल्हा सरचिटणीस युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सांगली)मा दिपक जावीर (विठ्लापूर)
मा हणमंतराव केंगार (कौठुळी)मा संदिप ढोक (दिघंची)
सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments