कृषी विधेयक  समर्थन व महाआघाडी निर्णया विरुद्ध  भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन

उदगीर / प्रतिनिधी : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी उदगीर  भारतीय जनता पार्टी तर्फे आघाडी सरकारने काढलेल्या स्थगिती आदेशाची होळी करून महाआघाडी  सरकारचा जाहीर निषेध करत उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनावेळी माजी आमदार गोविंद आण्णा  केंद्रे,  नागनाथअण्णा निडवदे, भगवान दादा पाटील तळेगावकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.
   कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाची बाजू मांडण्यासाठी व शेतकरी हिताचा हा कायदा आहे हे पटवून देण्यासाठी, तसेच राष्ट्रपतिद्वारा स्वाक्षरी करून कायदा पारित झालेला असताना त्याला कोणतेही राज्य सरकार स्थगिती देऊ शकत नाही किंवा आव्हान देऊ शकत नाही, तरी महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने केंद्राच्या कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत स्थगिती आदेश काढून आपला करंटेपणा दाखवून दिलेला आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रति कोणतीही आता नसून या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची खूप चांगले होणार आहे व नरेंद्र मोदी सरकार हे *शेतकर्‍यांचे सरकार* म्हणून पुढे येणार असल्यामुळे  राज्य सरकारने या विधेयकाला  स्थगिती दिली असली तरी ती टिकणार नाही म्हणूनच या स्थगिती  आदेशाची होळी उदगीर शहर भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली. आंदोलनस्थळी
 भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. आ. गोविंद आण्णा केंद्रे,  नागनाथअण्णा निडवदे,जेष्ठ नेते भगवानदादा पाटील तळेगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राठोड, उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज  बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले,तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे शहर अध्यक्ष उदयसिंह ठाकुर  पं. स.माजी उपसभापती रामदास भाई बेंबडे, पं.स.सदस्य सुभाष कांबळे,भाजपा जिल्हा सचिव तथा नगरसेवक गणेश गायकवाड, जिल्हा सचिव साईनाथ चिमेगावे, उत्तर कलबुर्गे, शामल कारामुगे,मधुमती कनशेट्टे ,नगरसेवक मनोज दादा पुदाले, ऍड दत्ता पाटील,राजकुमार मुक्कावार,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मजगे,संजय मामा पाटील ,बापूराव येलमटे मामा, नागेश अष्टुरे,पप्पू गायकवाड,आनंद बुंदे,आनंद साबणे ,तालुका अध्यक्ष अमोल निडवदे,संतोष बडगे,रवींद्र बेद्रे देवीलाल कांबळे,प्रीतम,व्यंकट काकरे,सुरज हंद्रगुळे, आदींसह पक्ष पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. उदगीर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष उदयसिंह  ठाकूर यांनी या आंदोलनाचे सर्व नियोजन केले.