लिंगायत महासंघाच्या देवणी तालुका अध्यक्षपदी शेषेराव मानकरी यांची निवड

देवणी / प्रतिनिधी : लिंगायत महासंघाच्या देवणी तालुक्याच्या अध्यक्षपदी धडाडीचे व कल्पक व्यक्तिमत्व असलेले शेषेराव मानकरी यांची आज लातूर येथे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी जाहीर केली.
लिंगायत महासंघ महाराष्ट्रभर लिंगायत समाज बांधवाचे जोरदार संघटन करीत आहे.त्यामुळें महाराष्ट्रातील तरुणांचा  लोंढा लिंगायत महासंघ या प्रमाणिक संघटनेकडे वाढला आहे. प्रा सुदर्शनराव बिरादार सर हे अतिशय मेहनती,सर्व सामान्य कार्यकर्ते ते सरकार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवून आहेत.सरांचे कार्य खुप मोठे आहे.या कार्याला पुढे नेण्यासाठी व देवणी तालुक्यातील लिंगायत समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेषेराव मानकरी यांची निवड बिरादार सरांनी केली आहे.अशी माहिती लिंगायत महासंघाचे सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
शेषेराव मानकरी यांची निवड झाल्याबद्दल लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ काशिनाथ राजे,, जिल्हासंघटक नागनाथअप्पा भुरके, माणिक कोकणे, वैजनाथ जट्टे, विजयकुमार कुडुंबले सिद्रामप्पा पोपडे,लिंगायत महासंघाचे सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी व निलंगाव उदगीर शाखेच्या सर्व पदाधिका-यांनी  मानकरी यांचे अभिनंदन केले आहे .शहर कार्यकारिणी ,शहराध्यक्ष   तसेच तालूका पदाधिका-यांची लवकरच निवड केली जाणार असल्याचे चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले. या निवडली बदल देवणी तालुक्यातील सर्वत्र सावकारचे अभिनंदन होत आहे ,