राशन कार्ड नसणाऱ्या गरजू महिलांना राशन कीट वाटप

उदगीर / प्रतिनिधी : इनरव्हिल क्लब उदगीर यांच्या मार्फत ज्यांना राशन कार्ड नाही अशा गरजूंना मोफत धान्या चे कीट वाटप करण्यात आले. 
          प्रोजेक्ट मेनेजर सौ निलिमा पारसेवार यांच्या सहकार्याने लोणी येथील वीटभट्टी वरील गरजु महिला, रेल्वे स्टेशन गरजु वरील महिला यांना राशन किट चे वाटप करण्यात आले. ४० कुटुंबांना  राशन किट चे वाटप करण्यात आले. त्या किट मध्ये जीवनावश्यक वस्तु साखर, गोडतेल, तांदूळ, दाळ, गव्हाचे पीठ, बिस्किट याचा समावेश होता... 
      या वेळी इनरव्हिल क्लब च्या अध्यक्षा सौ मिरा चेंबुले, सचिव सौ शिल्पा बंडे, सौ स्वाती..गुरूडे, सौ स्नेहलता चणगे, सौ निलिमा पारसेवार, सौ मानसी चन्नावार, सौ अनुराधा मुक्कावार, सौ वर्षा तिवारी यांची उपस्थिती होती