राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेबा मार्फत जिल्हाधिकार्यांना निवेदन
देवणी / प्रतिनिधी : चढ्या भावाने खत विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र वाल्यांचे परवाने रद्द करणे व तालुका कृषी कार्यालय तील सर्व कर्मचारी मुख्यालय राहण्याबाबत
रासप च्या वतीने सध्या पेरणीचे दिवस तोंडावर आल्याने देवणी शहर व देवणी तालुक्यातील शेतकरी बांधवांना आत्तापासूनच खत मिळवणे यासाठी शहर व तालुक्यातील देवणी वलांडी बोरोळ जवळगा अशा सोयीच्या ठिकाणी खरेदी करावे म्हणून विचारणा केली असता खताची जी किंमत आहे त्या किंमती प्रमाणे खत न देता चढ्या भावाने खत विक्री करीत आहेत यात शेतकऱ्यांचा नाविलाज झाला असून काही शेतकरी खरेदी करीत आहेत याचा अर्थ लातूर जिल्ह्यात दोन मंत्री असून खताची चढ्या भावाने विक्री केली जात असल्याने कृषी सेवा केंद्र वाल्यांचे कि शेतकऱ्यांचे हे मंत्री असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे महाआघाडी सरकार खता बाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता म्हणून चढ्या भावाने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र वाल्यावर कठोर कारवाईचे संकेत दिले असले तरी तालुका कृषी कार्यालय चे तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी सहाय्यक कृषी अधिकारी हे कृषी सेवा केंद्राची दुकानदाराकडून आर्थिक संगणमत करून कृषी सेवा केंद्र दुकानदारांना पाठीशी घातले जात आहे यात एकही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत व लातूर उदगीर निलंगा येथून चार ते आठ दिवसाला येऊन काम पाहतात तरी यांच्यावर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन चढ्या भावाने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र दुकानदारांचे परवाने रद्द करावे व मुख्यालयी राहत नसलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सनदशीलr मार्गाने योग्य तो आंदोलन करण्यात येईल असे आव्हान राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा प्रमुख व बसवा टीव्ही मराठी चॅनल महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांनी निवेदनात असे नमूद केले
0 Comments