महाराष्ट्र" बस्वन्नाच्या समतेच केंद्र बनाव.
-- प्रा शिवाजीराव दादा देवनाळे

देवणी / प्रतिनिधी : बाराव्या शतकात समता क्रांतीला सुरुवात करून म् बस्वेश्वराने हजारो वर्षाच्या जुन्या स्वार्थी धर्म ग्रंथाला लगाम घातला. वयाच्या ८ व्या वर्षी स्वतःची मुंज नाकारुन वेद, पुरान भाकड कथा, ग्रंथ यांच्या प्रथा परंपरा नाकारून सद्सद् विवेक बुद्धीला चेतना देनारे पृथ्वितलावरील  ते पहिले महामानव. त्यांनी मानव नि र्मित् सामाजिक विषमतेला हादरा दिला. स्त्री विषमता आणि अस्प्रश्यता यातील जातीयतेचि धगधगती आग शमविन्यासाठी बस्वेशरानि स्वतः अग्नीशी कवटाळले. बसवकल्याण हे समता क्रांतीचे केंद्र असले तरी महाराष्ट्र राज्यातील मंगळ वेढा हे त्या समता क्रांतीचे उग मस्थान आहे. १९५०  ला अमलात आलेले संविधान नि डॉ० बाबासाहेब आंबेडकर याचे मौलिक विचार जगभर पसरतात पण १२ व्या शतकात अमलात आलेलि समता महाराष्ट्रात  का रुजली नाही ? नवी स्वप्न नवे विचार घेऊन निघालेला फुले शाहू आंबेडकर याचा महाराष्ट्र बस्वन्नाच्या समतेच केंद्र बनाव असे मौलिक विचार प्रसिद्ध विचारवंत तथा वादळ संस्थापक प्रा शिवाजीराव दादा देवनाळे यांनी बस्वेश्वर् जयंती ऑनलाईन व्याख्यान मालेत मांडले.
   डॉ० बाबासाहेब आंबेडकर सशोधन व् प्रशिक्षण  संस्था बार्टी पुणे समता दूत लातूर जिल्ह्यच्या वतीने घेण्यात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे
अध्यक्ष प्रकल्प अधिकारी राजकुमार धनासिरे होते. पुढे बोलताना प्रा देवनाळे म्हणाले इस वि पूर्व ६ शतकात तथागताने बहुजन हिताय नि बहुजन सुखाय हा वैश्विक् विचार मांडले तर १२ व्या शतकात म. बस्वेशवर् यांनी सर्वे जन: सुखिनो भवतु ( जगातील सर्व मानव सुखी व् आरोग्यवान होवोत ) असा जागतिक विचार मांडणारे बस्वेशवर् बुद्धा नंतर चे बुद्ध आहेत. हा विचार बसव क्रांती चा आत्मा आहे. इतकी अफाट वैचारिक दौलत महाराष्ट्रात असताना आजही या राज्यात ग्रामीण भागात एक गाव एक पाणवटा नाही,एक गाव एक स्मश्यान भूमी नाही, सर्व मानव समुहा साठी मंदिर खुले नाहीत हे बस्वेशवराच्या पवित्र भूमीत किती दिवस चालणार ? स्त्री, कष्टकरी,अस्प्रुश्य्, आदिवासी, वेश्या,जोगनि,मुरळी एकुनच् मानवी कल्यानाचा समता वादी विचार मांडणारे बुद्धा नंतर चे एकमेव महामानव.
       कल्याण नगरिक अनुभव मंडपाची स्थापना करून त्यात अनेक जातीच्या लोकांना शरण,शरणी बनवीन्यात आले. हे अनुभव मंडप म्हणजे मानव मुक्तिच् विद्यापीठ होत. नटवर जतिचे  शुद्र् अल्लम् प्रभू पहिल्या पीठाचे प्रमुख बनले . तर चोर उरु लिंग पेद्दि बस्वन्नाच्या विचाराने एका पीठाचे पट्टा भिशक्त् अधिकारी बनले. बस्वेश्वराचा  हा मानवमुक्ती  विचार महाराष्ट्र राज्यासह् देशात रुजला असता तर जाती अंताची लढाई येशस्वि होऊन मानवी समाजातील हे भयावह चित्र वेगळे  दिसले असते. पण  करणी नि कथनि यात भेसळ आली कि महामानवाच्या विचाराचा खून होतो नि देश अधोगतीकडे वाटचाल करतो याची आठवण हि त्यांनी या व्याख्या ना द्वारे करून  दिली.
या कार्यक्रम येशस्विते साठी सदाविजय पवार,राम बनसोडे,पद्माकर कांबळे,सदाबाहर पवार,सचिन मोरे,बालाजी गिरी,रघुवीर रोहे,पुष्पावती शिंदे,मनोज कापसे,गोविंद झा कडे,यांनी मौलिक योगदान दिले.