बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेची महाडिबिटी पोर्टलवर होणार अंमलबजावणी
लातूर,(जिमाका)दि.21:-सन 2020-21 पासून कृषि विभागाच्या योजनांची महाडिबिटी पोर्टलद्वो अंमलबजावणी करण्यासाठी शसन मान्यता देण्यात आली आहे.यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील ) या योजनाचा समावेश आहे. त्यानूसार अर्ज स्विकारल्या पासून लाभार्थ्यांना अदा करण्यापर्यंतची प्रक्रिया सुरू आहे.
या योजनातंर्गत अनेक लाभार्थीनी नवीन विहीर व इतर घटकासाठी अर्ज केला असतानाही नवीन विहीर या घटकशिवाय इतर घटकसाठी त्याची निवड झाली आहे. त्यामुळे इतर घटकासाठी त्यांना पात्र करता येत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाडिबिटी पेार्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करताना, पोर्टलवर माहिती भरत असताना सिंचन सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही. या टॅबमध्ये सिंचन सुविधा उपलब्ध आहे. हा पर्याय निवडला असल्याने त्यांची नवीन विहिरीसाठी निवड न होता इतर बाबीसाठी निवड झाली असावी असे नाकारता येत नाही.
या बाबाींचा विचार करता ज्या शेतकऱ्यांकडे कोणतीही सिंचन सुविधा उपब्ध नसल्यास व असे शेतकरी नवीन विहिर व त्यासोबतचे घटक याचा लाभ घेऊ इच्छित असल्यास अशा शेतकऱ्यांना पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करत असताना सिंचन सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही या टॅबमध्ये सिंचन सुविधा उपलब्ध नाही हा पर्याय निवडून शेतकरी लाभ घेऊ इछिणाऱ्या घटकांमध्ये नवीन विहीर प्रथम प्राधान्याने सलेक्ट करून या नवीन विहीरी सोबतचे आवश्यक घटक सलेक्ट करावेत,असे आवाहन कृषि विकास अधिकारी सुभास चोले यांनी केले आहे.
0 Comments