अहिल्यादेवी होळकर   मराठा साम्राज्याच्या माळवा प्रातांतील लढवय्या होत्या---सचिन मंगनाळे
----------------------------------
देवणी / प्रतिनिधी  : लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.  
  लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्वेसर्वा सचिन जी मंगनाळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले  अहिल्यादेवी होळकर ह्या मराठा साम्राज्यातील शूरवीर लढवय्या होत्या असे मत 
सचिन मंगनाळे व्यक्त केले 
मंगनाळे पुढे म्हणाले की  अहिल्यादेवी होळकर  माळवा प्रांताच्या लढाईत स्वतः  सैन्याचे नेतृत्व केले  
त्यांचे कार्य शूरवीरता पाहून  एक इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकरांना   भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारिट  असे म्हटले असल्याचे सांगितले
इंग्रजी लेखक  लारेन्स यांनी  अहिल्यादेवी होळकरांची तुलना रशियाची राणी  मार्गारिट यांच्याशी तुलना केली  असल्याचे सांगितले  
अहिल्यादेवी होळकर याना  भारतातील माळव्याच्या जहागीरदार  होळकर घराण्याच्या राणी म्हणूनही ओळखल्या जात होत्या त्या न्याय दाना साठी प्रसिध्द होत्या  त्यांनी भारतातील अनेक हिंदू मंदिराचे बांधकाम करून त्यांचा जीर्णोद्धार केला असल्याचे सांगून  द्वारका, काशी, उज्जेन, नाशिक, परळी वैजनाथ, मंदिराची उभारणी अहिल्यादेवी होळकर यांनी केली असल्याचे सचिन मंगनाळे यानी या प्रसंगी सांगितले  
या जयंती निमित्त डॉ मालिकार्जुन सुरशेट्टे , डॉ सोनाली सूरशेट्टे ,माधव मोरे, इलाही शेख, रोहित मोदी, दत्ता ढवळे, बबलू शेख, लखन डीघोळे इत्यादि उपस्थित होते कोरोनाचे सर्व नियम पाळत कमी मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली सर्वांचे आभार सचिन मंगनाळे यांनी मानले 
-----गिरीधर गायकवाड