ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड येथे ई -आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
मुखेड / प्रतिनिधी : ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान)महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथे १०जून २०२१ रोजी भूगोल विभाग व आय.क्यू.ए.सी.यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय ई परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत  'Sustainable Development  Goals: Initiatives, Execution and Challenges.'या विषयावर विचारमंथन होणार आहे. या परिषदेस उद्घाटक म्हणुन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्र-कुलगुरु डॉ.जोगेंद्र सिंह बिसेन हे राहाणार आहेत.तर की नोट स्पीकर म्हणुन  प्रोफे. लाल मेरवीन धर्मश्री (डिपार्टमेंट आॅफ जाॅग्रफी यूनिव्हर्सिटी आॅफ केलानिया,श्रीलंका)तर रिसोर्स पर्सन म्हणुन  प्रोफे. डॉ.हाफिजा खातून( डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी अंड इन्व्हरमेंट काझी मोतीहार हसन बदन यूनिव्हर्सिटी  ढाका,बांगलादेश )  प्रोफे. डॉ.मोहम्मद ताहीर खान, (युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन,पाकिस्तान), विनोद कुमार भारद्वाज जयपुर,(राजस्थान)प्रोफे. डॉ.राजेश कुमार (युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली) डॉ.एस.सी.आडवीटोट,प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अरूण पाटील इस्लामपूर, डॉ.मंजूनाथ मानकरी,(चेअरमन, भूगोल अभ्यास मंडळ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच या परिषदेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब व संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य गंगाधरराव राठोड हेही उपस्थित राहणार आहेत.
  तेंव्हा परिषदेसाठी वरील विषयावर संशोधन पत्र दि.०९ जूनपर्यंत मागविण्यात येत आहेत.
      सदरील परिषदेचा मोठ्या संख्येने फायदा घ्यावा असे आवाहन परिषदेचे मुख्य संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, भूगोल विभाग प्रमुख डॉ.वसंत नाईक,आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक प्रा.बळीराम राठोड, सहसंयोजक प्रा. डॉ.देविदास केंद्रे,प्रा. डॉ.उमाकांत पदमवार व प्रा.श्रीकांत जेवळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.