वलांडीत डेंग्यू सदृश्य आजाराचे थैमान

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचा अंदोलणाचा ईशारा

देवणी / प्रतिनिधी : तालुक्यातील : वलांडी येथील आझाद नगर येथे घाणीचे साम्राज्य पसरल्याने डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. महिन्याभरातच  25 रुग्ण या आजाराला बळी पडले आहेत . 
 वलांडी येथील आझाद नगर मध्ये अंतर्गत नाल्याअभावी  सर्व सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने डेंगी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे एकाच गल्लीत डेंग्यूसदृश्य आजाराचे 10 रुग्ण आढळून आली आहेत. आरोग्य विभाग मात्र आद्यपही या पासून गाफील आहे. वलांडी चे आरोग्य केंद्र केवळ नावालाच उरले आहे.भौतिक असुविधांच्या बाबतीत मात्र एक नंबरवर आहे. येथे कायमस्वरूपी डॉक्टर ची गरज असतानाही केवळ ऐक डॉक्टर पाठवून वलांडीकरांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. रुग्णाला डेंग्यू ची लक्षणे जाणवत असतानाही त्यांना पुढे पाठवण्याचे किंवा त्यांना योग्य तो उपचार करण्याचे कष्टही घेतले जात नाही. जे सर्वसाधारण औषधे आहेत त्यावरच रुग्णांची बोळवण केली जात आहे. यासर्व प्रकाराकडे लोकप्रतिनिधी मात्र मुकसंमती असल्याप्रमाणे वागत आहेत. गावातील भौतिक सुविधाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक समस्यांनी तोंड वर काढले आहे त्यामुळे अनेक साथीचे आजार वाढत आहेत. दरवर्षी डेंग्यू हा आजार मोठया प्रमाणात वलांडीत पसरतो गेल्या वर्षी देखील या आजाराने 5 बालके दगावली होती मात्र आद्यपही आरोग्य विभाग असो वा ग्रामपंचायत प्रशासन यापासून धडा घ्यायला तयार नाही. घरोघरी जाऊन पाण्याचे नमुने तपासन्याचे काम असलेले एम पी डब्लू म्हणून कार्यरत असणारे कर्मचारी फक्त पगारापूरतेच आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. *कोडग्या कोडग्या लाज नाही , कालची गोष्ट आज नाही* अशी काहीशी दयनीय अवस्था आरोग्य विभागाची झाली आहे.येत्या दोन दिवसात वरील मागण्याची पूर्तता नाही झाल्यास अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्रच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला. दिलेल्या निवेदनावर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती वलांडी शाखाध्यक्ष सगीर मोमिन, शफी सय्यद, यासीन मुर्शेद, शकील तंबोली, सुर्यवंशी आकाश, मुंजेवार आवेज, शेख जुबेर, मंगेश गायकवाड, सौदागर गौसोद्दीन, ए.वाय. मुंजेवार, युनुस सय्यद, अतिक सौदागर, सोम मोदाळे, देविदास बनसोडे,साबेर पठाण,मुन्ना सय्यद असलम ताबोंळी, कृष्णा भंडारे,संदीप साबणे,ईसुब शेख,यासीन मुंजेवार, दत्ता सोनकांबळे, शौकत शेख,मनीयार आजम,रफीक शेख,शिवाजी हुलसूरे आदी नागरिकांच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत.