निझामोद्दीन पिंचणी यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार व निरोप समारंभ संपन्न
-------------------------------------------
देवणी/प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये देवणी विभागात वरिष्ठ तंत्रज्ञ असलेले निझामोद्दीन अब्दुल वहाब पिंचणी हे आपल्या सेवेची ४० वर्ष पूर्ण करून दि.३० जून २०२१ रोजी आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले.त्याबद्दल देवणी विभागात त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहीरोद्दीन हे होते तर व्यासपीठावर राज्य कार्याध्यक्ष देवक्तते, सचिव मध्व्हरे, सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता वैजनाथ शिंदे व उपकार्यकारी अभियंता प्रदीप कटकधोंड यांची उपस्थिती होती.यावेळी श्री.पिंचणी यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
निझामोद्दीन अब्दुल वहाब पिंचणी हे दि.१ जानेवारी १९८१ रोजी अंबाजोगाई-परळी विभागात रोजंदारी कामगार म्हणून रुजू झाले. या भागात त्यांनी १० वर्ष सेवा बजावली.त्यानंतर दि.१जानेवारी १९९१ रोजी ते उदगीर विभागात रुजू झाले.येथे उदगीर शहर व ग्रामीण भागात त्यांनी सेवा बजावली.त्यानंतर १९९५ मध्ये ते हेल्पर म्हणून सेवेत कायम झाले. उदगीर व नळगीर भागात त्यांनी सेवा बजावली .त्यानंतर २०१५ मध्ये ते देवणी विभागात रुजू झाले.तेथे देवणी-येणकी भोपणी भागात त्यांनी सेवा बजावत दि.३० जून २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले.त्याबद्दल देवणी उपविभागाच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी श्री.निझामोद्दीन पिंचणी यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला.तसेच त्यांचा मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन व आभार श्री.भराड साहेब यांनी मानले.

0 Comments