मौ.शेल्हाळ ग्रामपंचायत कार्यालयात वसंतराव नाईक जयंती निमित्त क्रषीदीन साजरा
उदगीर / प्रतिनिधी : तालुक्यातील मौ.शेल्हाळ येथे हरित क्रांतीचे प्रनेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता.एक) ग्रामपंचायत कार्यालयात क्रषीदीन साजरा करण्यात आला.
या वेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन युवा नेते तथा सरपंच प्रतिनिधी मनोजभाऊ चिखले यांच्या शुभहस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव नामदेवराव बिरादार, शरदभाऊ मोरे,सौ.भारतबाई प्रभाकर कांबळे, बालाजी शिवाजी सुर्यवंशी,ग्रामसेवक पि.वाय.पवार, पोकराचे प्रशिक्षक बि.आर.टाळीकोटे, क्रषीमित्र सुर्यभान वामनराव चिखले, विशाल धनराज गोजेगावे,दत्ता श्रीमंगले, चंद्रकांत पाटिल, शिवाजी जयराम मोरे,भीम मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उदगीर : शेल्हाळ (ता.उदगीर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करताना युवा नेते व सरपंच प्रतिनिधी मनोज चिखलेंसह उपस्थित मान्यवर.

0 Comments