तळेगाव जि प के.शाळेस उप जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट. 


देवणी/प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील मौजे तळेगाव भो येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला उप जिल्हा अधिकारी गणेश महाडीक यानी सदिच्छा भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या बाला उपक्रमा अंतर्गत कामाची पहाणी केली.व समाधान व्यक्त केले कर्मचारी व गावक-यांचे अभिनंदन केले.   

यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी अच्युत पाटील, नायब तहसीलदार तरंगे, गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव बोईनवाड, विषयतज्ञ राजेंद्र वजनम, सरपंच सदाशिव रामचंद्रराव पाटील,  ग्रामसेवक गोरे एस आर, पताळे श्रीकांत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानोबा विळेगावे, मुख्याध्यापक भंडे एस बी, बिरादार ए एस, पांचाळ एस एम, खैरमोडे एम एम, आदीसह केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.