मौजे. किणीयल्लादेवी येथे महाएनजीओच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम
उदगीर / प्रतिनिधी : दि.18/07/2020रोजी, माझा देश माझी जबाबदारी, महाराष्ट्र राज्य महाएनजीओ फेडरेशन व लोकसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किंनीयल्लादेवी तालुका उदगीर जिल्हा लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुपौर्णिमा, श्याम प्रसाद मुखर्जी व स्वर्गीय रमेश रमण स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय वृक्ष लागवड संवर्धन अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.हे वृक्षारोपण अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त मौजे .किणीयल्लादेवी येथे मातंग समाज येथील समशान भूमी मध्ये व मौजे किणीयल्लादेवी अंतर्गत रस्त्याच्या कडेने करण्यात आले.याप्रसंगी वृक्षारोपण करण्यासाठी मौजे.किणीयल्लादेवी ग्रामपंचायत उपसरपंच श्री ज्ञानोबा कीर्तिकर तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत लाडके त्याचबरोबर राजेंद्र कांबळे, शुभम कीर्तीकर,धीरज कांबळे, अभिनव कांबळे अभिलाशा कांबळे तसेच लोकसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष काळबा गोपाळ कांबळे व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विष्णू कांबळे यांच्या उपस्थितीत वृक्षरोपण कार्यक्रम करण्यात आले.वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते युथ पॅंथरचे उदगीर तालुका अध्यक्ष नागनाथ ससाणे हे सुद्धा उपस्थित होते.

0 Comments