शिवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन
देवणी / प्रतिनिधी : शिवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी .यांना ओबीसी आरक्षणाच्या हक्कासाठी निवेदन देण्यात आले राजकीय व इतर मिळणारा लाभ ओबीसीसाठीचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी मा मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, यांना समाजाच्या भावना कळवाव्यात अशी विनंती यावेळी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली या प्रसंगी शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत आप्पा शेटे,श्रीपती दरेकर संपर्क प्रमुख कर्नाटक, युवराज बिराजदार जिल्हा उपाध्यक्ष , महेश पाटील वलांडी विध्यार्थी आघाडी लातूर जिल्हा अध्यक्ष,जितेंद्र शिवगे देवणी तालुका संपर्क प्रमुख, प्रकाश केळकर, प्रभू कोरे,जगन्नाथ कोळंबे ,वैजनाथ सावळे, संगमेश्वर स्वामी यासह अनेक शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments