अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतले शैक्षणिक पालकत्व

पुणे/प्रतिनिधी : मुलगी शिकली प्रगती झाली 
या उपक्रमाअंतर्गत केवळ फी अभावी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अनेक गरीब मुलींचे शैक्षणिक पालकत्व आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतले.
     शिक्षणाला कमी महत्व देऊन मुलींना घरकाम, धुणी भांडी या कामाला जुंपले जाते पर्यायाने त्यांच्या शिक्षणाचा प्रवास खंडित होतो. अशा उपक्रमाद्वारे त्यांचा शैक्षणिक प्रवास परत सुरु झाल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर आज जाणवत होता.
अभिजात शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ख्यातनाम शास्त्रीय गायक  पं शौनक अभिषेकी प्रमुख पाहुणे, तसेच नगरसेवक जयंत भावे, स्वीकृत नगरसेविका सौ मिताली सावळेकर* उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन *सौ केतकी कुलकर्णी* यांनी केले, *मंदार रेडे* यांनी प्रास्ताविक मध्ये महासंघाच्या प्रगतीचा, संघटनेची माहिती दिली. *सौ जयश्री घाटे* यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला, *राहुल जोशी* यांनी आभार मानले.
मुलींच्या शिक्षणासाठी महासंघ करत असलेल्या कामाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले व आगामी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
Social distancing पाळून झालेल्या या कार्यक्रमाला अभिजात शाळेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच महासंघाच्या सर्व शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपास्थित होते.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे या गरीब मुलींसाठी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक अनुदान व शैक्षणिक साहित्य एक कर्तव्य म्हणुन देण्यात आले.