उद्योजक विजयकुमार मानकरी यांच्या सौरऊर्जा प्रकल्पाचा लवकरच लोकार्पण सोहळा 

तालुका विजभारनियनातून मुक्त होणार..
---------------------------------

देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील शेतकरी इतर व्यवसायिकांना  भारनियमना मुळे होणारा त्रास लक्षात घेऊन कांग्रेस चे युवा नेते उद्योजक विजयकुमार मानकरी यांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करून सर्व तालुक्याला भारनियमनातून मुक्त करण्याचा संकल्प विजयकुमार मानकरी यांनी केला पुत्राच्या हाकेला प्रतिसाद देत कांग्रेसचे जेष्ठ नेत मल्लिकार्जुन मानकरीे यांनी सौरऊर्जा प्रकल्पाकडे स्वतः लक्ष व वेळ देऊन अगदी कमी वेळात कोटयावधी रुपये चा प्रकल्प उभा केला या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम लवकरच होणार आहे त्यामुळे देवणी तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य माणूस विजभारनियमनातून मुक्त होणार आहे  या सौरऊर्जा प्रकल्पात संपूर्ण तालुक्यातील लोकांना पुरून उरेल इतकी वीज निर्मिती होणार आहे महावितरण विभागाशी करार करून ही वीज पुरवठा करण्यात येणार आहे हा नाविन्यपूर्ण उपक्रम विजयकुमार मानकरी राबवित असल्यामुळे त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहे  लोकांच्या सर्वांगीण हिताचे  उपक्रम राबविले हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांचे काम आहे कोणत्याही मतदारसंघात असे प्रकल्प लोकप्रतिनिधी राबवित असताना दिसत नाही त परंतु  आपण ज्या तालुक्यात राहतो त्या लोकांचे काहीतरी देणं लागतो असा उदात्य हेतू ठेऊन त्यांची कोणत्याना कोणत्या कार्यातून ऋण उतराई होता यावी स्वार्थातून परमार्थ साधता यावा यांच्यातून या प्रकल्पाची निर्मिती झाली आहे या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार असल्याचे मल्लिकार्जुन मानकरी यांनी सांगितले