......अखेर चार वर्षापूर्वी पळवलेली देवणी तहसीलदारांची  जीप मिळाली ! जीपची अत्यंत दुर्दशा ...याला जबाबदार कोण?
----------------------------------
देवणी / प्रतिनिधी (गिरीधर गायकवाड):दि 14 ऑगस्ट येथील तहसील कार्यालयाला आलेली नवीन शासकीय जीप तत्कालीन उदगीरचे  उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देवणीचा प्रभारी चार्ज असताना सत्तेचा गैरवापर करून नवीन जीप आपल्याकडे ठेऊन उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या कार्यालयाची भंगार जीप देवणी तहसील कार्यालयाला पाठवली होती ती जीत अतिशय जीर्ण अवस्थेतील असल्याने कोठेही बंद पडत  होती. या शासकीय वाहनाला खाजगी वाहनाचे टोचून करून देवणी तहसील कार्यालयाला ओढत आणावे लागत होते यांची दुर्दशा पाहून काही वृत्तपत्र माध्यमाने देवणी तहसील कार्यालयाच्या शासकीय वाहनांची पळवा पळवी असे वृत्त प्रकाशित होताच नवीन जीप कोठे गेली यांची शासकीय स्थरावरुन चौकशी केली असतात सदर जीप उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे असल्याचे निदर्शनास येताच देवणी येथील नागरिकांची आंदोलनाची भूमिका पाहून  उदगीर येथील उपजिल्हाधिकारी यांनी देवणी कार्यालयाची शासकीय जीप देवणी तहसील कार्यालयाला पाठविली आहे ती जीप उपजिल्हाधिकारी यांनी वापरल्यामुळे तीही जीप अतिशय खराब झाली आहे त्यामुळे देवणी तहसील कार्यालयाला नवीन शासकीय वाहन देण्यात यावे अशी मागणी होत आहे
देवणी तहसील कार्यालयाचे उपविभागीय कार्यालय निलंगा आहे उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालय याचा व देवणीचा काहीच संबंध नसताना निलंगा उपजिल्हाधिकारी यांची बदली झाली असल्याने उदगीर उपजिल्हाधिकारी यांच्याकडे काही दिवसांसाठी प्रभारी चार्ज होता त्याच कार्यकाळात देवणी तहसील साठी नवीन जीप अली होती पदाचा गैरवापर करून ही गाडी तब्बल चार वर्षे वापरली सदर जीपही अतिशय खराब झाली आहे देवणी तहसील कार्यालयाची नवीन जीप जाऊन अखेर जुनी का होईना मिळाली ही रस्त्यात कोठे बंद पडू नये म्हणजे बरे देवणीच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना नवीन गाडी पोलीस निरीक्षक याना नवीन जीप  व तालुक्यातील सर्वच यंत्रणा महसूल विभागाचे तालुका दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्या तहसीलदार यांना भंगार गाडी तालुकादंडाधिकारी यांचा अवमान नाही काय असा सवाल देवणीकर उपस्थित करीत आहेत देवणी कार्यालयाला नवीन शासकीय जीप देण्याची मागणी होत आहे