अक्का फाऊंडेशच्या पुढाकारातून नागतीर्थवाडी ठरले मराठवाड्यातील कोविड लसीकरण 100% पूर्ण करणारे पहिले गाव

देवणी / प्रतिनिधी : अक्का फाउंडेशनच्या पुढाकारातून नागतीर्थवाडी गावाने सर्व गावाचे कोविड लसीकरण 100%पूर्ण करत मराठवाडा विभागात पहिले लसीकरणयुक्त येण्याचा मान मिळवला आहे.. नागतीर्थवाडी देवणी तालुक्यातील पहिले निर्मलपुरस्कृत गाव अवघ्या 674 लोकसंख्या असलेल्या या गावाने गावातील 18वर्षावरील सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण केले अंतिम टप्प्यात गावातील अतीवयोवृद्ध.. दिव्यांग...लोकांना लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम राबवित.. लोकांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले आणि ग्रामस्थांनी साथ देत गाव करोनामुक्त करण्यात यश मिळाले.
या मोहिमेत निलंगा विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार श्री. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांच्या सूचना आक्का फाउंडेशन   च्या माध्यमातून मा. श्री . अरविंद भैय्या पाटील निलंगेकर साहेब यांच्या वेळोवेळीचे मार्गदर्शन  व अक्का फांऊडेशनचे समन्वयक श्री रामलिंग शेरे  याचे सहकार्य हे महत्त्वाचा घटक आहे.
यामध्ये प्रशासक म्हणून देवणीचे तहसीलदार सुरेशजी घोळवे साहेब, आणि देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब यांनी गावात वेळोवेळी भेटी देऊन नागरिकांना लशी बाबतीत सखोल मार्गदर्शन लाभले
तसेच आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे साहेब , तालुका आरोग्य डॉ. गुरमे साहेब , वैद्यकीय अधिकारी चैतन्य हत्ते साहेब आणि लस उपलब्धता करून देण्यात सहाय्य केले. 
प्रत्यक्षात लस देण्यासाठी गावात येऊन लसीकरण आपल्या दारी माध्यमातून वयोवृद्ध व अपंगाना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अमोल नरहरे साहेब , आरोग्य सेविका सुरवसे शोभा, बिरादार आर .व्ही. , मळभागे जे. के. , आशा कार्यकर्त्या भूमिका कासले गावातील राज गुणाले , उपसरपंच विष्णुदास गुणाले, ग्रामसेवक श्रीकांत पताळे सर्व ग्रा.प. सदस्य यांनी परीश्रम घेतले.