हेमंत पाटील यांची नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर लवकरच घोषणा

पुणे :  भारत अगेन्स्ट करप्शनचे संस्थापक अध्यक्ष आरटीआय अॅक्टीव्हिस्ट श्री हेमंतजी पाटील यांची NSP नॅशनल काऊन्सिल च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी कार्यकारणीच्या बैठकीत एकमुखाने घोषणा करण्यात आली. 
मा हेमंतजी पाटील हे सामाजिक, राजकीय, चित्रपट, क्रिकेट अशा विविध क्षेत्रात कार्यरत असुन राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. अनेक दिग्गज राजकीय व्यक्तींवर जनहीत याचींकांद्वारे अंकुश ठेवत लोकशाही दृढ करण्याची जबाबदारीही हेमंतजी पाटील यांनी पार पाडली आहे.  आण्णा हजारे यांच्या सोबत काम केलेलं असुन पक्षाला नवी उर्जा हेमंतजी पाटील मिळवून देतील असा विश्वास जेष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक अभिजित आपटे यांनी बोलुन दाखवला. 
पुणे पत्रकार भवन येथे लवकरच हेमंतजी पाटील यांचा सत्कार व घोषणा होणार आहे.