सुप्रसिद्ध साहित्यिक - कवी विलास सिंदगीकर यांचा सत्कार..                      

जळकोट / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ,शाखा जळकोटच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी विलास सिंदगीकर यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मा.श्री.डॉ. उद्धवरावजी  भोसले (कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड) आणि   महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम , पर्यावरण व संसदीय कामकाज           राज्यमंत्री  मा.ना.श्री.संजयजी बनसोडे  यांच्या संयुक्त शुभास्ते सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ, पुष्पहार व ग्रंथ देऊन सत्कार  करण्यात आला .सावित्रीबाई फुले अनु. जाती निवासी आश्रम शाळा, जळकोट येथे दि .3/9 /2021 रोजी दु.2.00वा . जळकोट तालुक्यातील केकत सिंदगी येथील क्रांती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर यांची  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ,मुंबईच्या सदस्यपदी निवड, जि.प .शाळेत 'बालाउपक्रम' अभिनव पद्धतीने राबवलेल्या काही निवडक शाळा मुख्याध्यापक व  शिक्षकाना सन्मानपत्र आणि दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे उत्कृष्ट  आयोजन करण्यात आले होते. 
        या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.मन्मतआप्पा किडे  (मा. कृषी सभापती जि. प. लातूर) हे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व पर्यावरण,सार्वजनिक बांधकाम,संसदीय कामकाज राज्यमंत्री म.ना.श्री .संजय भाऊ बनसोडे, तर या             कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते लातूर जिल्ह्यातील कुमठा गावचे भूमिपुत्र मा.डॉ. उद्धवरावजी भोसले (कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड )तर या         कार्यक्रमाचे मुख्य अतिथी महाराष्ट्राचे शिक्षक नेते मा. श्री.शिवाजीराव साखरे  (वाघ), जळकोट प. स. चे सभापती मा. श्री .बालाजी ताकभीडे , राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे ता. अध्यक्ष मा .श्री .अर्जुनमामा आगलावे पाटील, लातूर जिल्हा परिषदेचे गटनेते मा. श्री .संतोष तिडके ,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष मा .श्री. मारुती पांडे, काँग्रेसचे  ज्येष्ठ नेते मा. श्री. बाबुराव जाधव ,जळकोटचे तहसीलदार मा. श्री .संदीप कुलकर्णी ,गटविकास       अधिकारी मा .श्री .चंद्रहार ढोकणे,  उपसभापती मा. सौ .सुनंदा धर्माधिकारी  ,शिक्षण समितीचे लातूर जिल्हा अध्यक्ष  मा. श्री. किशनराव बिराजदार, ज्येष्ठ पत्रकार 'दलितमित्र' मा.श्री .एम जी .मोमीन ,सं.गां. योजनेचे अध्यक्ष. संग्राम पाटील आदी. मान्यवर उपस्थित होते .या प्रार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण समितीचे तालुका  अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळेचे संस्थापक मा .श्री .  प्रकाशजी मरतुळे यांनी केले .उत्कृष्ट सूत्रसंचालन संतोष सोनवळे व  प्रा .माधव वाघमारे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर नकोरे यांनी मानले .तत्पूर्वी      कार्यक्रमाची सुरुवात गुरुदत्त विद्यालयाच्या संगीत विभागाचे प्रमुख  प्रा. धूळशेटे व प्रा. सी.एम .कांबळे यांच्या स्वागत गीताने  व  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .कोविड -19  चे नियम पाळून शानदार व देखना कार्यक्रम पार पडला .यावेळी गुणगौरव प्राप्त शिक्षकवृंदही  उपस्थित होते .