देवनगरी ऍग्रो कंपनी तर्फे सभासद पूर्ती सोहळा संपन्न
देवणी / प्रतिनिधी :तालुक्यातील विळेगाव येथे होत असलेल्या देवनगरी ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या चालू असलेल्या कमाल भाग विक्री पूर्ण झाल्याने सभासदांचे आभार व्यक्त करण्याकरिता सभासद पूर्ती सोहळा कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवणीचे ज्येष्ठ उद्योजक मल्लिकार्जुन मानकरी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे चेरमन डॉ. अरविंद भातंब्रे ,मल्लिकार्जुन डोंगरे ,बाबुराव लांडगे, अशोक लुल्ले, नागेश जिवणे , राजकुमार हुडगे ,अनंत अचवले, देविदास बेलकुंदे,प्रा. रेवण मळभगे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सभासद भाग विक्री करण्याकरिता अथक परिश्रम घेतलेले गणपत पाटील, चवणहिप्परगा लक्ष्मण पाटील,गुरनाळ, दीपक येरमे, कमालवाडी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी जितेंद्र शिवगे,राहुल बिराजदार, ईश्वर पाटील,प्रशांत बळते, बसवराज मळभगे , प्रीतम भाद्रशेट्टी , सागर शिंदे, प्रशांत फावडे ,साईनाथ गायकवाड आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
0 Comments