"मुलांनो...देऊ देशासाठी योगदान"
=======================
मानवतेला करू कीर्तीवंत
विसरुनी धर्म, जात, पंथ
अन् घेऊ एकतेची आन
मुलांनो...
देऊ देशासाठी योगदान
मनाने होऊया पवित्र
सर्व मिळूनी येऊ एकत्र
गाऊ मानवतेचे सुंदर गान
मुलांनो...
देऊ देशासाठी योगदान
नको भेदभाव कुणाचा
नको द्वेष करू कुणाचा
नको कुणाचा अपमान
मुलांनो...
देऊ देशासाठी योगदान
इतिहास मोठा शौर्याचा
सत्याचा आणि त्यागाचा
करू महिमा कीर्तिवान
मुलांनो...
देऊ देशासाठी योगदान
भारत मातेचे तुम्ही बालवीर
तुम्हीच उद्याचे शूर सरदार
राखा भारतमातेचा मान
मुलांनो...
देऊ देशासाठी योगदान
बालवीरांनो देऊ कार्याचे मोल
भारतमातेला जगी नाही तोल
अशी थोर वाढवू भूमातेची शान
मुलांनो...
देऊ देशासाठी योगदान
गीतरचना:-
श्री द. सु. जाधव
संपर्क:-९६८९२५०२५१
0 Comments