चिमूर येथे तालुका स्तरीय आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेचा मेळावा संप्पन .24 सप्टेंबर योजना कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप निमित्त जिल्हा परिषद कार्यालय समोर विशाल धरणे आंदोलन करण्याचा आय टक चा इशारा.
चिमूर : चिमूर येथील वारजुकर हॉल मध्ये आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेचा तालुका स्तरीय मेळावा दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी आय टक संघटनेचे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या मार्गदर्शनात तर लता रामटेके यांच्या अध्यक्षतेखालीआयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा सचिव ममता भिमटे ,संगीता निखाडे, अर्पणा धनविजय,शिला मेश्राम, निरंजना मेश्राम,तृप्ती थुटे उपस्थितीत होते. यावेळी अनेक आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांना नी आपल्या समस्या बाबतीत मनोगत व्यक्त करून सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला. आणि भविष्यात तीव्र लढा करण्याचा इशारा दिला.
यावेळी मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या विषही चर्चा करण्यात आली.यामधे आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांना किमान 21000 रू.वेतन देण्यात यावे.शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे .सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी.एप्रिल पासून चे वाढीव दोन व तीन हजार रुपये मानधन वाढ तातडीने देण्यात यावे. कोरोना भत्ता पूर्ववत सुरू ठेवण्यात यावा.ग्राम पंचायत स्तरावरून मे 2020 पासून चे 1000 रू.प्रोत्साहन भत्ता थकीत आहे .ते तात्काळ देण्यात यावे. आशा वर्कर व गट प्रवर्तक यांचा कामावर आधारित मोबदला दर महिन्याला देण्यात यावा यासह अन्य मागण्या संदर्भात चर्चा करून .मोदी सरकार च्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व योजना कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देऊन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.म्हातारपणात 60 वर्षा नंतर 10000 रू.पेन्शन लागू करण्यात यावी याकरिता आय टक सह ईतर 10 केंद्रीय संघटनेच्या नेतृत्वात योजना कर्मचाऱ्यांचा 24 सप्टेंबर 2021 रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.त्या नुसार आय टक च्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय समोर विशाल धरणे आंदोलन करण्याचा इशारा कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे. व सदर आंदोलनात काम बंद ठेऊन योजना कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विनोद झोडगे यांनी केले आहे.
यावेळी तालुक्यातील शेकडो आशा व गट प्रवर्तक महिलां उपस्थित होत्या.
दि.19/9/2021
आपला
कॉ.विनोद झोडगे जिल्हा अध्यक्ष आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना संलग्न आय टक चंद्रपूर.
0 Comments