इनरव्हील क्लब उदगीरला डीसी यांची भेट आणि स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव
उदगीर / प्रतिनिधी : दिनांक 29 ऑगस्ट 2021रोजी डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोषजी सिंग यांनी आय डब्ल्यू सी उदगीरला भेट दिली. या अभूतपूर्व सोहळ्याची सुरुवात स्वागत गीता ने करण्यात आली. तसेच त्यांच्या स्वागतासाठी गणेश वंदना डान्स ठेवण्यात आला होता. आय डब्ल्यू सी उदगीरचे सर्व सभासद उपस्थित होते. या सोहळ्यात संपादक पल्लवी मुक्कावार यांनी आय डब्ल्यू सी उदगीर, सर्व प्रोजेक्टचे उत्कृष्ट बुलेटीन तयार केले.यावेळी "हिरकणी" ई बुलेटिन प्रकाशित करण्यात आले. यावेळी अग्निशामक विभागातील स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांचा संतोष सिंग यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. हा सोहळा शिवनंदा फंक्शन हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती दुरुगकर यांनी केले. यावेळी अध्यक्ष मीरा चंबुले, सचिव शिल्पा बंडे, उपाध्यक्ष स्वाती गुरुडे, उपसचिव नीलिमा पारसेवार, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, संपादक पल्लवी मुक्कावार, आय एस ओ स्नेहलता चणगे यांचे सहकार्य लाभले.
0 Comments