कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार
उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन बाजार समितीच्या सभागृहात सभापती सिद्धेश्वर (मुन्ना) पाटील यांनी केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती रामराव बिरादार हे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा सौ.उषा कांबळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटुरे, विनोद सुडे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल कांडगीरे, दावणगावचे व्हा.चेअरमन धनाजी मुळे, संचालक सुभाष धनुरे,कुमार पाटील, गौतम पिंपरे, पं.स. सदस्य माधव कांबळे, माजी नगरसेवक नरसिंग शिंदे, बबन धनबा, कुणाल बागबंदे, राहुल पाटील मलकापूरकर, उत्तरा कलबुर्गे, नीता मोरे, सरोजा बिरादार, ललिता झिल्ले, बालिका मुळे, सरोजा वारकरे, अनिता बिरादार, सतिश पाटील मानकीकर, आदी उपस्थित होते.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड, सचिव सिध्दार्थ सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगिरथ सगर, बसवेश्वर डावळे, सहसचिव सुधाकर नाईक, कोषाध्यक्ष बबन कांबळे, सदस्य नागनाथ गुट्टे, संग्राम पवार,रोटरीचे सचिव रविंद्र हसरगुंडे, शंकर बोईनवाड यांच्यासह उत्तरा कलबुर्गे, निता मोरे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पहार घालुन आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नळगीरचे माजी सरपंच संगम शेटकार, प्रकाश कापसे, राजकुमार हुडगे, कपिल शेटकार, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदकुमार पटणे यांनी केले.
0 Comments