वलांडीत मुख्य रस्त्यावरील सी सी कॅमेरे बनले शोभेची वस्तू.

सी सी कॅमेरे चालू असते तर चोरी झालेल्या मालाचा तपास लागलाच असता.

बंद असलेले सी सी कॅमेरे चालू करण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने केली मागणी.

देवणी : तालुक्यातील वलांडीत गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत सह मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते परंतु ते सीसीटीव्ही कॅमेरे चालूच नसल्याने बसवलेले सी सी टीव्ही कॅमेरे हे मुख्य रस्त्यावरील फक्त शोभेची वस्तू बनली आहे.
महाराष्ट्र शासनाने आदर्श गाव बनविण्यासाठी राज्यातील अनेक ग्रामपंचायतीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे व प्रत्येक कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्थित राहण्यासाठी बायोमेट्रिक मशीन बसविण्याची योजना केली आहे परंतु वलांडी हे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असल्याने चोरापासून बाजार पेठेची सुरक्षित राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले परंतु ते अद्याप चालू नसल्याने ते केवळ शोभेची वस्तू बनली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी वलांडी तील मुख्य बाजारपेठेतील धान्याने भरलेली गाडी चोरट्यांनी पळवून घेऊन गेले त्यावेळेस ग्रामपंचायतीने बसवलेली सीसीटीव्ही चालू राहिलेली असती तर त्या चोरट्यांचा तपास लागला असता असे अनेक प्रकरण व चोर्‍या या कॅमेर्‍याने उघडकीस आले असते. त्यामुळे वलांडीतील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित चालू करावे अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, शाखा अध्यक्ष समीर मोमिन, पत्रकार अजिस सौदागर, संदीप जगताप आदी मान्यवरांनी वलांडीचे ग्रामविकास अधिकारी एच.एम केंद्रे यांना निवेदनाद्वारे मागणी केली.