मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ग्रंथभेट

देवनी : रसिका महाविद्यालय देवणी जिल्हा लातूर येथील ग्रंथपाल तथा उपप्राचार्य डॉ. शिवाजी नारायणराव सोनटक्के व औसा येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. नामदेव खंडगावे संपादित "घडली आम्ही पुस्तकांमुळे चं...!" या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. 17 सप्टेंबर 2021 रोजी मराठवाडा संग्राम दिन व नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या  27 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून डॉ. शिवाजी नारायणराव सोनटक्के यांनी विद्यापीठाचे कर्तव्यदक्ष व दूरदृष्टी असणारे कुलगुरू माननिय डॉ. उध्दवजी भोसले साहेब, आदरणीय प्रो कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन साहेब, कुलसचिव डॉ सर्जेराव शिंदे सर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. रवी सरोदे सर, प्रभारी लेखा व वित्त अधिकारी डॉ. डी.एम. खंदारे सर, विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. जगदिश कुलकर्णी सर इत्यादि मान्यवरांना "घडलो आम्ही पुस्तकांमुळे च...!" या पुस्तकाची प्रत्येकी एक प्रत भेट देण्यात आली. यावेळी सर्वच मान्यवरांनी संपादकांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.