प्रेरक प्रेरिकांना नवीन योजनेत व थकित माधनासाठी,न्याय मिळवून देणार- व्यंकट पन्हाळे

प्रेरक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न 

देवणी / प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील साक्षर भारत योजनेत काम कलेल्या प्रेरकांच्या न्याय हक्कासाठी व पुढील लढाईसाठी प्रेरकांची बैठक लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात लोकाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व्यंकट पन्हाळे यांच्या अध्यक्षेखाली व निवृत्त प्रकल्प अधिकारी निरंतर शिक्षण चे कांबळे साहेब,  सदार साहेब,  साक्षर भारत प्रेरक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भुजंग अर्जुने सुगावकर, पत्रकार रविकिरण सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत  रविवारी बैठक संपन्न झाली.           
भारत सरकार च्या प्रौढ व अल्पसंख्याक विभागामार्फत सन २०११ ते २०१८ दरम्यान गावामध्ये निरक्षरांना साक्षर करण्यासाठी साक्षर भारत ही योजना राबविण्यात आली. या योजनेतंर्गत लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक प्रेरक व एक प्रेरीका अशा दोन निवडी परिक्षा घेऊन करण्यात आल्या. प्रत्येक महीनाचे मानधन दिले नाही. व साक्षर भारत योजना ही बदलून पढना लिखना हे नविन अभियान काढून प्रेरकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. व येणाऱ्या काळात प्रेरकांना न्याय मिळवून देणार असल्याचे लोकाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व्यंकट पन्हाळे यानी लातूर जिल्ह्यातील प्रेरकांच्या बैठकीत सांगितले. प्रेरकांचे थकीत मानधन व नवीन योजनेत समावेश हे लक्ष आता लोकाधिकार संघटनेचे असुन प्रेरकांना न्याय मिळवून देण्याची भुमिका ही माझी असून येणाऱ्या काळात लढा उभारण्याची तयारी करण्याचे प्रेरकांना आवाहन केले. बैठकीत अनेक प्रेरकांनी आपल्या व्यस्था मांडून शासनाने आपल्यावर कसा अन्याय केला आहे ते सांगितले.
 यावेळी लक्ष्मण रणदिवे, प्रकाश घोरपडे, किशोर मोरे, संजय कांबळे, रमेश माने, गोविंद इंगळे, सुरेश कामत, सुनिल पांढरे, विष्णु ढोबळे, रामदास केंद्रे, बालाजी गवळे, दिपक जाधव, जीवन सुर्यवंशी, नवनाथ गायकवाड, आण्णासाहेब शिंदे, पुजा ढमाले, वैशाली देशपांडे, वैशाली शिंदे, रूपाली मोरे, रामदास कदम, सलीम बिराजदार, नामदेव सुर्यवंशी, उर्मिला काळे, कोराळे रेखा, शोभा बिरादार,पंढरी जोळदापके, आदी सह जिल्ह्यातील प्रेरकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
 सुत्रसंचलन बालाजी गवळे यांनी केले तर आभार लक्ष्मण रणदिवे यांनी मानले.