तळेगाव(भो) येथील श्री भोगेश्वर गणेश मंडळाचे वृक्षारोपण करून बाप्पाचे विसर्जन  

देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील तळेगाव(भो) येथील श्री भोगेश्वर गणेश मंडळाने गणेश उत्सवाच्या निमित्ताने लसीकरण मोहीम राबवून 200 लोकांचे लसीकरण केले व तसेच २५ लोकांचे RTPCR चाचणी, बैठक भजन,स्वच्छता मोहीम राबून आदर्श निर्माण केला.
    मंडळाच्या वतीने वृक्षारोपण मा.तहसीलदार सुरेशजी घोळवे साहेब सरपंच सदाशिव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवणी पंचायत समितीचे उपसभापती शंकरराव रामचंद्रराव पाटील, ग्रामीण महिला विकास संस्थेच्या प्रमुख सौ.कुशावर्ता बेळे, शालेय समितीचे ज्ञानोबा विळेगावे,तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी जाधव, मुख्याध्यापक भंडे सर, मंगलाताई जोशी, व्यंकटेश कुलकर्णी,मुक्ता बिरादार,जयतीर्थ जोशी उपस्थित होते.
    मंडळाने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोरोनाचे नियम पाळून विविध सामाजिक उपक्रम राबवून गणेश विसर्जन केले. मंडळाचे सर्व विकास बिरादार,महादेव कोटे,कृष्णा पाटील,गोविंद इंगोले,कृष्णा इंगोले,शिवकुमार स्वामी,अच्युत जोशी,योगेश इंगोले,तुकाराम माणकेश्वरे,सिद्धेश्वर कोटे,आकाश पाटील, दत्ता बिरादार,सुदर्शन नवाडे यांनी परिश्रम घेतले.