गऊळ येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा विटंबना व मातंग समाजावर लाठी हल्ला केलेल्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हे दाखल करा अन्यथा या पेक्षाही भयानक तीव्र आंदोलन छेडू (मास)
- सूर्यकांत तादलापूरकर
देवणी / प्रतिनिधी (लक्ष्मण रणदिवे) : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये गऊळ या गावामध्ये दिनांक: ०२/०९/२०२१ रोजी मातंग समाजाचे दैवत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करून पत्रकारांसह संपूर्ण मातंग समाजावर बाबू गिरे यांनी पोलीस प्रशासनातील उपअधीक्षक किशोर कांबळे यांना हाताशी धरून महातीव्र लाठी हल्ला घडविल्या प्रकरणी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा असे नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ. विपिनी इटणकर व पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा हल्ल्या संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्या मुळे
महाराष्ट्रातील समस्त मातंग समाजाच्या संघटनेच्या व सर्व पक्षातील समाजाचे नेते कार्यकर्ते यांच्या वतीने दिनांक:२१/०९/२०२१रोजी तीव्र निषेध महा धडक मोर्चा काढण्यात आले सदर या घटनेतील आरोपींन वर तात्काळ गुन्हे दाखल करावे व समाज बांधव वर झालेले गुन्हे वापस घ्यावे पुनासा त्याठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सन्मान आले बसविण्यात यावे पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत पोलीस विभागीय अधीक्षक किशोर कांबळे कंधार तहसीलदार वेंकटेश मुंडे एसडीएम बोरगावकर आणि या लाटेने हल्ल्यांमध्ये कट कारस्थान रचणार जातीवादी समाजकंटक बाबू गिरे यांच्या तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावे व समाजाच्या दृष्टिकोनातून अनेक मान्यवरांनी आपले मत तीव्र शब्दात व्यक्त केले या निषेध महामोर्चा मध्ये मातंग समाजातील सर्व सामाजिक संघटन व सर्व पक्षातील समाजाचे नेते कार्यकर्ते यांनी सिंहाचा वाटा उचलला होता पण आपलेच काही पाटलाचे खेटर उचलणारे पुढाऱ्यांनी हा मोर्चा तीव्र स्वरूपात होत होता पण होऊ दिले नाही याची सुद्धा मला खंत वाटते असे मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे मास जिल्हाध्यक्ष नितीन तलवारे म्हणाले व या निषेध मोर्चा च्या माध्यमातून जर वरील लोकांवर गुन्हे दाखल करून अटक न झाल्यास मातंग अस्मिता संघर्ष सेना (मास) व संपूर्ण संघटनेच्या पाठिंबा सहित यापेक्षाही तीव्र आंदोलन घडवण्याची वेळ येऊ देऊ नये असे सर्व संघटनेच्या वतीने शासनाला इशारा देण्यात आले या मोर्चामध्ये मातंग समाजाच्या हितासाठी कुठेतरी अन्यथा मला पाहिजे यासाठी आवर्जून या मोर्चामध्ये निषेध नोंदवण्यासाठी नांदेड येथे दाखल झालेले बहुजन रयत परिसर पक्षाचे राष्ट्रीय नेते लक्ष्मण ढोबळे भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र उपाध्यक्ष मारोती वाडेकर ,गणेश तादलापुरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा सरचिटणीस शंकर भाऊ तडाखे लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रा. सदाशिव भुयारे प्रशांत इंगोले वंचित बहुजन आघाडी श्याम कांबळे वंचित बहुजन आघाडी शिवा नरंगले कॉ गंगाधर गायकवाड कॉम्रेड गणपत भिसे रमेश गालफाडे राजू सोनसळे मनिष कावळे विनोद गवाले संतोष भालेराव अनिल कावडे प्रीतम गवाले उद्योजक माधव डोमपल्ले रयत पक्षाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गूंडुले मास संघटनेचे देवणी तालुक्यातील देवणी अध्यक्ष विकास गायकवाड,गोकुळ दंतराव संपर्क प्रमुख, रणदिवे लक्ष्मण लातुर जिल्ह्यातील प्रसिद्धी प्रमुख,रतन सुर्यवंशी,समस्त समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
0 Comments