इनरव्हील क्लब  तर्फे सेवानिवृत्त महिला  शिक्षकांचा सत्कार.

उदगीर / प्रतिनिधी:इनरव्हील क्लब ऑफ उदगीर यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व  सेवानिवृत्त महिला शिक्षकांचा एक छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या
इनरव्हील  क्लबच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अंजली बनशेळकीकर ,उषा तोंडचिरकर, प्रेमलता नळगिरे ,लक्ष्मी अंबेसंगे, धरणी शर्मा, माधुरी नायगावकर, लक्ष्मीबाई विठ्ठलराव पाटील,  सुनीता नेलवाडकर ,जहागीरदार अरुणा ,सरोजनी जनवाडकर, मैनाताई साबणे या सर्वांचा  सत्कार करण्यात आला. 
 कार्यक्रमाच्या सुरुवातीला उषा तोंडचिरकर मॅडम यांनी सुंदर असे गाणे गाऊन सर्वांची मने जिंकली प्रत्येकाने आपले -आपले मनोगत व्यक्त केले व आपले अनुभव सर्वांसमोर मांडले. खूप दिवसांनी आपल्या समवयस्क मैत्रिणीशी भेटलो याचा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी इनरव्हिल क्लबच्या भरभराटी साठी  शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती गुरूडे, नीलिमा पारसेवार, पल्लवी मुक्कावार ,स्नेहलता चणगे, मानसी चन्नावार ,प्रीती दुरुगकर, मीरा गुरुडे ,डॉ.प्रियंका राठोड यांचे सहकार्य लाभले.