चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन
श्री बाळासाहेब नवाडे यांचा सत्कार संपन्न

उदगीर / प्रतिनिधी : विकास नगर उदगीर येथील बाळासाहेब नवाडे हे मौजे शेकापूर गावचे रहिवासी असून त्यांची विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. करिता आज चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने बाळासाहेब नवाडे व त्यांच्या टीमचे पॅनल प्रमुख शिवाजी कोनाळे, सरपंच ज्ञानोबा कोनाळे,संदिप हालकरे,माधव सावंत यांचे सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापूरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झेरीकुंटे सर तर आभारप्रदर्शन श्रीकांत पाटील यांनी केले.
      या प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील, बालाजी पाटील नेत्रगावकर, सय्यद शकिल,कंजे साहेब, तानाजी जाधव,भुसनवाड सर, ज्ञानोबा मुंढे, रमेश खंडोमलके, राजेंद्र सुगावे स्वामी, कल्याण बिरादार, शेकापुरचे मुख्याध्यापकअलिबादे सरआदी मित्रपरिवार उपस्थित होते.