समाजसेवक सचिन मंगनाळे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा
----------------------------------
देवणी / प्रतिनिधी :  येथील सामाजिक, शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रातील औषध क्षेत्रात प्राविण्य मिळवून  आपल्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर अभ्यास करून  विविध अनेक प्रकारच्या औषधीच्या माध्यमातून अनेक रोगावरील वेदनावर फुंकर मारून अनेक रुग्णांना वेदना मुक्त करणारे औषध क्षेत्रातील गाढे अभ्यासक, लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्ते,एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व सा लोकअस्मिता वृत्तपत्राचे संपादक, विचारवंत, परखड वक्ता, गायक, संत साहित्यातील संप्रदायाचे वारकरी अशा बहुआयामी व्यक्तिमत्व सचिनजी मंगनाळे यांचा वाढदिवस देवणी येथील शाश्वत हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसा निमित्ताने वृक्षलागवड रोग्यांना फळे वाटप, करून साजरा करण्यात 
सचिन मंगनाळे हे उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील रहिवाशी असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र देवणी हेच राहिले आहे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात एवढे नाव मिळवले आहे त्यांचे करावे तेवढं कौतुक कमीच आहे त्यांना वैद्यकीय, क्षेत्रासोबत सामाजिक कार्याची आवड आहे समाजात वावरताना समाजातील दुःख समजावून घेऊन त्यावर काही मार्ग काढता येईल का यासाठी सचिन मंग नाळे सातत्याने प्रयत्न करीत असतात वयोवृद्ध लोकांना मोफत आरोग्यासाठी विविध प्रकारच्या शिबिराचे आयोजन करणे त्यांना लागणारे औषध उपलब्ध करून देणे गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे गोरगरीब महिलांना साडीचोळी वाटप करणे 
वृक्ष लागवड या शासनाच्या महत्वपूर्ण कामात आपला शंभर टक्के सहभाग नोंदवुन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे अश्या महत्वपूर्ण कामात सिंहाचा वाटा असणारे जेष्ठ समाजसेवक यांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला यावेळी डॉ मल्लिकार्जुन सुरशेठे , गजानन टिळे, संपादक गिरीधर गायकवाड ज्ञानेश्वर शिंदे, महादेव मोरे, घुडूसाब महाळगरे सह अनेक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते