योजना कर्मचाऱ्यांचा  देशव्यापी संप.चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय समोर आय टक च्या नेतृत्वात विशाल धरणे आंदोलन .सेवेत कायम करून घेण्याची मागणी.हजारो महिला कर्मचारी सहभागी.

चंद्रपूर : केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या 24 सप्टेंबर देशव्यापी योजना कर्मचाऱ्यांचा संपा निमित्त चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय समोर आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात नेतृत्वात विशाल धरणे आंदोलन आयोजित केले होते.
देशातील नागरिकांना आरोग्य ,शिक्षण,पोषण,रोजगार आदी मूलभूत शेत्रातील सेवा देणाऱ्या केंद्र व राज्याच्या विविध योजनांमधील मानधनावर  कामावर आधारित मोबदला आदी तत्वावर काम करणाऱ्यांचा समावेश आहे.त्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी मध्यान्ह भोजन योजना मधील शालेय पोषण आहार कर्मचारी ,एकात्मिक बालविकास सेवा योजना मधील अंगणवाडी सेविका मदतनीस,उमेद अंतर्गत काम करणाऱ्या आय.सी.आर.पी.महिला कर्मचारी, मनरेगा ग्रामरोजगार सेवक,बालकामगार शिक्षण प्रकल्पातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,अंगणवाडी आहार  पुरवठादार आदींचा योजना कर्मचाऱ्यांमध्ये समावेश होता.सरकारी योजनांमध्ये तळागाळात मूलभूत सेवा देण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या मनुष्य बळात महिलांची संख्या अधिक असून हे सर्व कर्मचारी सरकारी सेवेत असूनही त्यांना सरकारने कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन,सामाजिक सुरक्षा लाभा पासून वंचित ठेवले आहे असा आरोप केंद्रीय ट्रेड युनियन च्या वतीने करण्यात आले आहे.तेव्हा त्यांना त्यांचा मूलभूत अधिकार देण्यात यावा यासाठी 24 सप्टेंबर 2021 रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय समोर सकाळी 12 वाजता आय टक च्या नेतृत्वात विशाल धरणे आंदोलन करण्यात आले . यामधे योजना कर्मचाऱ्यांना कर्मचारी म्हणून करण्यात यावे.किमान 21000 रू. वेतन,10 हजार रुपये पेन्शन . व त्यांना ई. एस. आय. पि एफ.लागू करा.शापोआ कर्मचाऱ्यांना 12 महिन्याचा मानधन लागू करा.कंत्राटी करण अथवा सेंट्रल किचन पद्धत बंद करा.योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्न मे मार्गी लावण्यासाठी येत्या काळात सर्व शेत्रातिल फेडरेशन ,कृती समिती यांच्या सोबत मंत्रालय व जिल्हावार प्रशासकीय पातळीवर बैठका घेऊन सर्व स्थानिक समस्या तातडीने सोडवा.केंद्र सरकारने शापोआ कर्मचाऱ्यांना मागील दीड वर्षा पूर्वी दोन हजार रुपये मानधन वाढ देण्याचे मान्य केले होते.त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी यांना मासिक कोरोना भत्ता ऑक्टोंबर पासून पूर्ववत सुरू करा.उमेद अंतर्गत सर्व आय.सी. आर.पी महिला कर्मचारी यांचे मागील 18 महिन्या पासून चे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे.महाराष्ट्र राज्य यांच्या ग्रामविकास विभाग व नगर विकास विभाग यांच्या आदेश नुसार माहे मे 2020 पासून आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी यांना मासिक 1000 रू. कोरोना भत्ता ग्राम पंचायत व नगर परिषद,नगर पंचायत यांच्या मार्फत कोरोना काम असे पर्यंत दरमहा देण्यात यावे.यासह आदी मागण्यांचे निवेदन मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना देण्यात आले.यावेळी आय टक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे,संतोष दास, प्रा.नामदेव कनाके,प्रदीप चीता डे,राजू गैन वार, आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संघटने च्या जिल्हा सचिव ममता भिम टे,शहर सचिव सविता गटलेवार, निकिता निर , शालू लांडे,शकुंतला खोके ,सुनंदा  मु लमुले,छबू मेश्राम  मीना चौधरी ,गट प्रवर्तक संघटनेच्या सविता बोबडे, लता रामटेके ,अंगणवाडी कर्मचारी संघटने च्या रेखा रामटेके,शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वनिता कुंठा वार,श्रीधर वाढ ई, कुंदा कोहपरे,कल्पना रायपूरे,छाया मोहितक र,वनिता वासेकर, सुनंदा बेलेकर,उमेद संघटनेच्या वैशाली धोटे,यांच्या सह जिल्हा भरातील हजारो महिला योजना कर्मचारी उपस्थित होत्या.येत्या27 सप्टेंबर किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या भारत बंद आंदोलन मध्ये सर्व आय टक च्या नेतृत्वातील योजना कर्मचारी सहभागी होत असून ,आपापल्या तहसील कार्यालय समोर निदर्शने करून तहसीलदार मार्फत पंतप्रधान यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आय टक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी दिली आहे.
 दि.24/9/,2021
                   आपला
कॉ.विनोद झोडगे जिल्हा सचिव आय टक चंद्रपूर