उडान सेंटरचे अचवला येथे उद्घघाटन 

देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील अचवला येथे  आज दिनांक 03/09/2021 रोजी ग्रामीण महिला विकास संस्था देवणी व स्वीसएड पुणे यांच्या वतीने 20 गावातून राबवत असलेल्या लिंगआधारीत भेदभाव आणि कौटुंबिक हिंसाचार  प्रकल्पातील अचवला या गावात *उडान सेंटर*उद्घाटन करण्यात आले.
     उद्घाटनाचे अध्यक्ष सरपंच सौ सुरेखा पवार  व प्रमुख पाहुणे म्हणून देवणी तहसील चे मंडळ आधिकरी,अनिता ढगे मॅडम, उपसरपंच नामदेव कारभारी,ग्रामसेवक नागलगावे सर, पोलिस पाटील अनुचंद्र बोबडे, अंगणवाडी ताई बन ताई, तंटामुक्ती अध्यक्ष धोंडीराम पाटील, ग्रा. सदस्य बंटी बन, पियर एज्युकेटर्स गटातील महिला,पुरुष,युवक, व सर्व मुली उपस्थित होत्या.
प्रास्ताविक ग्रामीण महिला विकास संस्था देवणी च्या अध्यक्षा कुशावर्ता बेळे ताई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उडान सेंटर च्या माध्येमातून मुलींचा व्यक्तीमत्व विकास होईल व येणाऱ्या काळात स्त्री पुरुष समानतेची बीजे रोवली जातील. 
मंडळ आधिकारी ढगे मॅडम यांनी आपल्या भाषणात गाव पातळीवरील उडान सेंटर झाल्याने मुलींचा सर्वांगीण विकास होईल व शासनाच्या वतीने मदत करण्याची आश्वासन दिले व मुलगा पाहिजे हा आग्रह सोडून मुलगी ही घरची ज्योत आहे असे सांगितले.
 ग्रामसेवक नागलगावे सर यांनी ग्रामपंचयतीमार्फत सेंटर साठी मदत करण्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राधाकृष्ण देशमुख सर यांनी केले व कचराताई गायकवाड, प्रेरणा जाधव सत्यशिला सरवदे, सरोजा शिंदे, विजयश्री शिंदे,विकास बिरादार,कृष्णा इंगोले,नागनाथ सूर्यवंशी प्रेरक प्रदीप बिरादार प्रेरिका गायत्री बन आदींनी परिश्रम घेतले.