ऑक्सफम इंडिया तर्फे आशा कार्यकर्त्याना आशा किट वाटप 

उदगीर / प्रतिनिधी : आज दिनांक 3/09/2021 रोजी ऑक्सफम इंडिया तर्फे आशा कार्यकर्त्याना आशा किट वाटप करण्यात आले हाळी हंडरगुली आणि वाढवना (बु) येथील60 आशा कर्यांकत्याना आशा किट वाटप करण्यात आहे ।या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा.श्री. कल्याण पाटील साहेब ऑक्सफम इंडिया चे कार्यकारी संचालक श्री. परमेश्वर पाटील आणि त्याची टीम तसेच पंचायत समिती सदस्य तृप्ती ताई  धुप्पे पंचायत समिती सदस्य माधव कांबळे , डॉ.गजाई, डॉ. सुळे ,वाढवना चे सरपंच नागेश थोन्टे ,हाळी चे सरपंच गायकवाड,हाळी चे उपसरपंच राजकुमार पाटील, हंडारगुळी चे संतोष भोसले, खरेदी विक्री संघाचे संचालक प्रभाकर पाटील, चिमची वाडी चे उपसरपंच देविदास गुरमे, माजी पंचायत समिती सदस्य दत्ता बामणे,ग्राम पंचायत सदस्य अमजत पठाण, बालाजी काळे,सुनील खिडसे, हणमंत केसगिरे व तुकाराम शिंदे ,सलीम करकिले, अजमद उंदरे, अजीम डांगे व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उप सभापती ज्ञानोबा गोडभरले यांनी केले. आभार प्रदर्शन आम्रपाली कांबळे (BF)यांनी केले.