महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गरजू कलाकारांना मानधन द्यावे..!!  --- एनएसपी विदर्भ अध्यक्ष सौरभ रवींद्र फुलझेले.

मराठी टॅलेंट चित्रपट संघटना विदर्भ अध्यक्ष सागर भोगे, सचिन कालेस्पोर, आणि रोशन बघेल यांची मागणी.
नागपूर / प्रतिनिधी : सध्या संपूर्ण देशात कोरोना सारख्या रोगाने थैमान घातले आहे. सर्व कलाकारांवर काम नसल्याने प्रचंड आर्थिक ताण आलेला आहे, काम नाही, शूटिंग बंद, कलाकारांचे सर्व कामचं ठप्प झालेले आहेत. गेल्या तीन महिन्यात खूप आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, आणि या हालाखीच्या परिस्थितीत कलाकारांना जगण्या - मरण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे, अजून ही
परिस्थिती किती दिवस राहिल, हा प्रश्नच आहे. विदर्भा मध्ये खूप कलाकार आहेत, ज्यांचे कलाकारी वर त्यांचं कुटुंब चालतंय. सरकारी कर्मचारी यांना सातव वेतन लागू होऊ शकत, आणि आता कोरोना सारख्या महामारीत सरकारी कर्मचाऱ्याना घरबसल्या पेमेन्ट देण्यात येते तर कलाकार याचा तर जगण्या चा प्रश्न आहे.
      महाराष्ट्र शासनाला मागणी आहे कि विदर्भा मध्ये  प्रत्येक कलाकारांना मानधन देण्यात यावे. येत्या सात दिवसात कलाकारांना न्याय देण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र सरकारला नॅशनल सोशालिस्ट पार्टी तर्फे  करण्यात आली आहे.
एनएसपी नॅशनल सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नितीन तायवाडे यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करताना कलाकारांच्या प्रश्नावर चर्चा केले. लवकरच कलाकारांना मानधन स्वरूपी मदत करण्याची महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे.

     वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!

महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.


         BTV NEWS MAHARASHTRA